वाहनचालक संभ्रमात; पर्यायी रस्ता नसल्याने होणार दमछाम
। नेरळ । प्रतिनिधी ।
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग वरील कसारा येथून मुरबाड-कर्जत-खोपोली राष्ट्रीय महामार्गावर म्हसा येथे बांधण्यात आलेला नवीन पूल काही महिन्यात धोकादायक बनला आहे. या पुलाला भेगा पडल्या असून महामार्ग पुलाचे काम असे भेगा पडलेल्या बघून वाहनचालक प्रवास करताना घाबरत आहेत.त्यात आजूबाजूला जंगल असल्याने तेथे पुलाला काही धोका निर्माण झाल्यास पूर्ण राष्ट्रीय महामार्ग बंद होऊ शकतो. दरम्यान, पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही असा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.
महामार्गावर जुन्या पुलांच्या ठिकाणी नवीन पूल बांधून नवीन राष्ट्रीय महामार्ग आणखी मजबूत तयार करण्याचा राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या नवीन राष्ट्रीय महामार्गावर नवीन पुलांची निर्मिती झाली आहे.त्यात कर्जत तालुका हद्दीवर म्हसा येथे लहान पुलाच्या जागेवर नवीन पूल हे रस्ते विकास महामंडळ कडून बांधण्यात आला आहे. मे 2021 मध्ये म्हसा येथील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र पुलाचे काम पूर्ण होत असतानाच पुलाच्या आरसीसी बांधकामाला भेगा पडण्यास सुरुवात झाली होती.
त्यावेळी त्या रस्त्याने वाहने घेऊन प्रवास करणार्या वाहनचालक यांनी पुलाचे काम करणार्या अधिकार्यांना पुलाला पडलेल्या भेगांबद्दल तक्रारी केल्या. त्यात सिमेंट बांधकाम करताना तेथे पाण्याचा वापर देखील तेथे केला गेला नाही. मात्र आरसीसी बांधकाम होताना पाण्याचा वापर केला गेला जात नव्हता आणि त्यावेळी मे महिन्यातील कडक उष्मा सुरू होता. त्यामुळे पुलाचे बांधकाम सुरू असताना पुलाच्या सर्व भागात भेगा पाडण्यास सुरुवात झाली होती आणि आता तर सर्व भागात भेगा पडलेल्या दिसून येत आहेत.
म्हसा गावापासून कर्जतकडे येताना बनवलेल्या पुलाचे काम हे चांगल्या दर्जाचे झाले आहे. त्यात आरसीसी बांधकाम करताना नवीन रेडिमिस सिमेंट यात असलेले केमिकल यामुळे बांधकाम केल्यावर पाण्याची आवश्यकता राहत नाही. तरी देखील तक्रारी असतील तर पाहणी करून घेतली जाईल.
सीमा पाटील, उपअभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ
या रस्त्यावर बनवले जाणारे नवीन पूल ही आमच्या सारख्या सातत्याने प्रवास करणार्या वाहनचालक यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. पुलाला भेगा पडल्या असल्यामुळे या कामाचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे.
दिनेश भोईर-ग्रामस्थ,पोही