| पनवेल । वार्ताहर ।
फेसबुकवरुन ऑनलाईन महिलांचे कपडे मागवणे उलवे भागातील महिलेस चांगलेच महागात पडले आहे. सदर प्रकरणात सायबर चोरट्याने कुरीयर कंपनीचा प्रतिनीधी असल्याचे भासवून सदर महिलेने मागविलेले ऑनलाईन कपड्याचे पार्सल रद्द होऊ नये यासाठी तिला ऑनलाईन 5 रुपये पाठविण्यास सांगून त्याद्वारे तिच्या बँक खात्याची माहिती मिळविली. त्यानंतर त्याने सदर महिलेच्या खात्यातून 1 लाख 68 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. न्हावा- शेवा पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्या विरोधात गुन्हादाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. सदर प्रकरणात फसवणूक झालेली 45 वर्षीय महिला उलवे भागात राहण्यास असून एप्रिल महिन्यामध्ये या महिलेने फेसबुक वरील जाहिरातीतून मिळालेल्या व्हॉटस्अॅप वरुन ऑनलाईन महिलांचे ड्रेस मटेरीयलचे कपडे मागवले होते. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेने न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.