पुनीत सागर अभियानांतर्गत किनारे स्वच्छता मोहीम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जेएसएम महाविद्यालय, 6 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. युनिट, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि डी.एल.एल.इ. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुनीत सागर अभियान अंतर्गत गुरुवारी (दि.18) अलिबाग समुद्र किनार्‍यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी 6 महाराष्ट्र बटालिय, एन.सी.सी. युनिट, मुंबईचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनीष अवस्थी, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, एनसीसी प्रमुख कॅप्टन डॉ. मोहसीन खान, डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. सुनील आनंद, डॉ. मीनल पाटील, प्रा. गौरी लोणकर, एन.सी.सी. कॅडेट्स, एन.एस.एस स्वयंसेवक उपस्थित होते. कर्नल मनिष अवस्थी, प्रा. डॉ. अनिल पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अभियानामध्ये अलिबाग, पनवेल, पोयनाड, आणि महाड येथील कॉलेजमधील एन.सी. सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकार्‍यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन एन.सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. मोहसीन खान यांनी केले.

Exit mobile version