अलिबागचे समुद्रकिनारे होणार मजबुत

माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पाठपुराव्याला यश


| अलिबाग | प्रतिनिधी |


उधाणामुळे अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यांची नासधूस झाली होती. किनारे मजबुतीकरणासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांना यश आले असून या कामाला एमएमबी विभागाकडून मान्यता मिळाली आहे. बंधाऱ्याच्या कामाला अनेक दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच समुद्रकिनारे अधिक मजबूत होणार आहेत. येत्या दोन महिन्यात काम पुर्ण होण्याची अपेक्षा प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी सुमारे दोन लाख पर्यटक अलिबागला भेट देतात. समुद्रकिनारी फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शनिवार, रविवार व अन्य सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी समुद्रकिनारा फुलून जातो. पर्यटकांच्या व स्थानिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंधारे मजबूत करण्यासाठी त्यांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून मागणीला दुजोरा देण्यात आला. त्यासाठी सुमारे चार कोटी आठ लाख 33 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अलिबाग कोळीवाडा ते हॉटेल सी व्हूवपर्यंत बंधाऱ्यांचे काम केले जाणार आहे. या कामाला काही दिवसांपुर्वी सुरुवात झाली असून नाईक यांनी नुकतीच त्याची पाहणी केली. –

Exit mobile version