Raigad Crime! एका सिगारेटसाठी त्याने असे का केले?

। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील कासप गावच्या हद्दीतील श्रेयाभाई चायनीज येथे जांभिवली येथील वैभव देवराम कोंडीलकर (वय 30)व त्याचा मित्र हे जेवण करण्यासाठी बसले होते. त्यावेळी शेजारीच बसलेल्या कासप येथील संतोष माळी (वय 35) याने वैभव कोडींलकर यांच्याकडे सिगारेट मागितले. यावेळी वैभवने सिगारेट देण्यास नकार दिला.

या गोष्टीचा राग मनात धरून संतोष माळी याने वैभव कोडींलकर यास शिविगाळी करुन हाताबुक्याने मारहाण केली. तसेच चायनीज दुकानातील डब्याची कडी डोक्यात मारुन दुखापत करुन धमकी दिली. यानंतर वैभवच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार जयवंत अशोक बैकर तपास करीत आहेत. याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून आरोपी संतोष माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version