| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महिलेची छेड काढल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.5) अलिबागमध्ये घडला, अशी चर्चा सुरु आहे. हा ग्रामपंचायत सदस्य भाजपचा पदाधिकारी असल्याचंही बोलंल जात आहे. या प्रकाराबाबत जिल्हा कोषाध्यक्ष हेमंत दांडेकर यांना विचारणा केली असता त्यांना याबाबत काहीच माहित नसल्याचं सांगण्यात आलं.
अलिबाग शहरात शुक्रवारी त्या सदस्याला महिला छेडछाडप्रकरणी तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मिडियावरही याबाबत चर्चा सुरु होती. त्यामुळे याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात चौकशी केली असता कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं.
अखेर चर्चा सुरु असलेल्या त्या व्यक्तीला थेट संपर्क साधत सोशल मिडियावरील त्या चर्चेबाबत विचारणा केली असता त्याने हे राजकिय षड्यंत्र असल्याचं सांगितलं. तसेच, विरोधक आहेत कि आपल्याच पक्षाचे कोणी आहेत, याबाबत साशंकता व्यक्त केली.
दोन दिवसांपुर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या 5 नोव्हेंबरला होणार आहे. अशातच ग्रामपंचायत माजी सदस्याला झालेल्या मारहाणीच्या वृत्तामुळे ऐन निवडणूकीच्या काळात माजी सदस्याचा झालेला अपप्रचार त्यांना चांगलाच भोवणार असल्याची चर्चाही सध्या जोर धरु लागली आहे.