| पनवेल | वार्ताहार |
जेवणाचे बिल अधिकचे लावल्याच्या कारणावरून हॉटेलमालकास विचारणा केली असता हॉटेलमालक अजय कुमार पांडे, त्याच्यासोबत असलेला अनोळखी आणि हॉटेलमधील पाच ते सहा वेटर यांनी मिळून सळीने आणि लाकडी फळीने मारहाण केल्याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विलाल विहान हा सेक्टर 10, खारघर येथे राहत असून, तो मित्र व मैत्रिणींसह जेवणासाठी दिल्ली तंदुरी हॉटेल सेक्टर 10, खारघर येथे गेला होता. यावेळी वेटरने हॉटेलमध्ये बिजर हे पेय मिळते असे सांगितले. त्यांनी जेवणासोबत बिजर मागवली बिल देत असताना टोटल बिल अधिकचे वाढवून दिल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी बिल एवढे का लावले याची विचारणा केली असता वेटरने मालकाला फोन लावून दिला. त्यावेळी पैसे बरोबर लावले आहेत. ते बिल द्यावे लागेल, असे मालक बोलला. 9,500 रुपयांचे बिल वसूलकरण्यासाठी जबरदस्ती करू लागले. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. त्यांनी केलेल्या मारहाणीत विशाल जखमी झाला. विशालची मैत्रीण भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलाही धक्काबुक्की केली. काही वेळाने त्याचा भाऊ तेजदर हा भांडण- सोडवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण केली. याप्रकरणी खारघर पोलिस अधिक तपास करीत आहेत.