विशेष मुलांनी साकारल्या सुबक पणत्या

। उरण । वार्ताहर ।
दिवाळी सणाला थोडेच दिवस राहिले आहेत. दिवाळीत पणत्यांना विशेष महत्त्व असते.
या सणांना लागणार्‍या पणत्या उरण येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानतर्फे चालवीत असलेल्या सी बर्ड विशेष मुलांची शाळा (स्वीकार) उरण नगरपरिषदेचे स्वातंत्र्यवीर दिवंगत दत्ता रहाळकर मैदान, बोरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी सुंदर पणत्या बनविल्या आहेत.
या पणत्या 20 ते 200 रुपये दोन नग, त्याचप्रमाणे 80 ते 200 रुपये या दराने विकल्या जातात. शाळेतील विद्यार्थी दरवर्षी राख्या, पणत्या, तोरण, पाकीट, आहेर पाकीट, कागदी पिशव्या आदी बनवीत आहेत. त्या वस्तूंना उरण शहरातील सेंट मेरीज शाळा यूईएस, शाळा, श्रीमती भागुबाई चांगू विद्यालय,नवदुर्गा नवरात्र मंडळ बोरी, तसेच डी.पी.वर्ड कंपनी यांची मागणी असते. उरण तालुक्यातील समाजसेवक, दानशूर व्यक्तींचे सहकार्य मिळते, असे माधुरी उपाध्ये यांनी सांगितले.
1 सप्टेंबर 1999 रोजी बेलापूर येतील श्रीमती शिरीष पुजारी यांनी उरण येथे अवघ्या पाच मुलांना घेऊन शाळा सुरु केली.आज या शाळेत 40 विद्यार्थी शिकत आहेत. शाळेत एकूण चार वर्ग असून, 3 शिक्षक, 5 कर्मचारी आहेत. शाळेच्या पर्यवेक्षक माधुरी उपाध्येयांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वर्ग मुलांच्या कालागुणांना वाव देऊन चांगल्या प्रकारे शिकवीत आहेत.

Exit mobile version