बीएड बेरोजगारांचे आंदोलन

| सिंधुदुर्ग | वार्ताहर |

जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील डी.एड्. बेरोजगार तरुण व तरुणींनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. डी.एड्. बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष फाले यांच्याशी चर्चा करून परिपत्रकात बदल करण्याच्या मागणीसंदर्भात शिक्षण आयुक्तांकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. जोपर्यंत परिपत्रकात आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार बदल होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करू नये, अशी विनंती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना केली. डी.एड्. बेरोजगार 2010 पासून पदविका घेऊन बेरोजगार राहिल्याने डी.एड्. पदविका ज्येष्ठता निकष लावून नियुक्त्या द्याव्यात. असे न केल्याने त्यांची वयोमर्यादा संपुष्टात येणार आहे. त्याचप्रमाणे शाळा ज्या ग्रामपंचायत हद्दीत आहेत. त्याच हद्दीतील उमेदवारास प्रसंगी परिपत्रकातील उल्लेखात बदल करून संधी द्यावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

Exit mobile version