किसान सभेच्या आंदोलनाला बीड शेकापचा पाठिंबा

बीड | प्रतिनिधी |
शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी सोमवारी 1 नोव्हेंबर बीड येथील किसान सभेच्या आंदोलनाला शेकापने पाठिंबा जाहीर केला.
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची झाली असून, सन 2020 मधील पीक विमा त्वरित द्यावा,अतिवृष्टीचे आनुदान तात्काळ वाटप करा, अतिरिक्त ऊसाचे नियोजन करा या सह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सिरसाळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड अशी पायीदिंडी आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनास भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा असल्याचे पत्र शेकापचे प्रा उमाकांत राठोड, मोहन गुंड, अ‍ॅड नारायण गोले पाटील अ‍ॅड संग्राम तुपे ,भाई अर्जून सोनवणे, भीमराव कुट, मुकुंद शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि अखिल भारतीय किसान सभा जिल्हा सेक्रेटरी बीड यांना दिले.

Exit mobile version