महाराष्ट्र – मुंबईच्या तीन खेळाडूंना संधी
| मुंबई | वृत्तसंस्था |
बीसीसीआयने नुकतेच 19 वर्षाखालील भारतीय संघाची घोषणा केली. हा संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्धची तिरंगी मालिका आणि आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषकामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. भारताच्या या 19 वर्षाखालील विश्वचषक संघात महाराष्ट्र अन् मुंबईच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. यात सोलापूरचा अष्टपैलू खेळाडू अर्शीन कुलकर्णी आणि बीडच्या सचिन धसचा देखील समावेश आहे. तर संघाच्या नेतृत्वाची धुरा उदय सहारन याच्या खांद्यावर आहे.
यंदाचा 19 वर्षाखालील विश्वचषक हा आधी श्रीलंकेत होणार होता. मात्र सरकारचा अवाजवी हस्तक्षेप होत असल्याने आयसीसीने श्रीलंका क्रिकेट मंडळाचं बरखास्त केल्याने या विश्वचषकाचे यजमानपद हे दक्षिण आफ्रिकेला देण्यात आलं आहे. याविश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिका खेळणार आहे. यात भारताशिवाय यजमान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन संघाचा समावेश असणार आहे.
उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय 19 वर्षाच्या संघाचा उपकर्णधार हा कुमार पांडे आहे. याचबरोबर संघातील 15 खेळाडूं व्यतिरिक्त प्रेम देवकर, अशं गोसाई आणि मोहम्मद अमान या तीन राखीव खेळाडूंची देखील निवड करण्यात आली आहे. ते संघासोबत प्रवास करणार आहेत.
19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 चा भारतीय संघ संघ :
उदय सहारन (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर, अवनीश राव, सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला.
राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी. विघ्नेश, किरण चोरमले.