। म्हसळा । वार्ताहर ।
माणगाव-मोर्बा येथून म्हसळा येथे स्कूल बसमधून गोमांस वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मागणगाव येथील आरोपी डॉ. हुसेन याने गोवंश जातीच्या प्राण्याची कत्तल करून म्हसळ्यातील दुसरा आरोपीत निशाल अब्दुल गफुर (35) याने ते 250 किलो गोमांस विक्रीकरिता निळ्या काळ्या रंगाच्या मैजिक स्कूल बसमधून वाहतूक करीत असताना आढळून आला. त्यावर पोलीस शिपाई गणेश पवार यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कहाळे, पोलीस उपनिरीक्षक रोहिनकर, पोलीस उपनिरीक्षक धुमास्कर, पोलीस हवालदार बांगर, पोलीस शिपाई मुल्ला, हंबिर राठोड यांनी आरोपी म्हसळाकडे येत असताना त्याच्या गाडीचा पाठलाग केला. आरोपी म्हसळ्यातील ढोर्जे फाटा येथे आला असता तेथे त्याला पकडून स्कूल बसची तपासणी करण्यात आली. यावेळी त्या स्कूल बसमधून गोहत्या केलेले मांस आणि बससह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.







