राज्यात भीक मागण्यास बंदी येणार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही विधेयक मंजूर

| नागपूर | प्रतिनिधी |

राज्यात आता लवकरच भीक मागण्यास बंदी घालण्यात येणार आहे. विधानसभे पाठोपाठ आता विधान परिषदेमध्येही महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक मंजूर करण्यात आलं. परंतु, सभागृहातील अनेक सदस्य असमाधानी असताना गोंधळाच्या स्थितीत हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे तालिका सभापती नीलम गोऱ्हे, शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरा यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे विधेयक हे गोंधळाच्या स्थितीत विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. राज्याच्या मंत्री अदिती तटकरेंनी हे विधेयक मांडलं. त्यावर आमदार मनीषा कायंदे, अमोल मिटकरी आणि तालिका सभापती निलम गोऱ्हे यांनी असमाधान व्यक्त केलं. महारोगी शब्द वगळण्यासाठी आलेल्या विधेयकाचा आणि त्याचे शीर्षक यात ताळमेळ नसल्याची प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसेंनी दिली. तर, विधेयकाबाबत माहिती दिलेल्या पुस्तिकेतील स्पष्टीकरणावर तालिका सभापती नीलम गोऱ्हेंनी असमाधान व्यक्त केले. सभागृहातील अनेक सदस्य असमाधानी असतानाही विधेयक मंजूर करण्यात आलं. या संबंधित विधान परिषद सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

Exit mobile version