। रसायनी । वार्ताहर ।
यावर्षी पंचवीस दिवसांवर गोपाळकाला आल्याने देवळोली उसराई येथील बालगोविंदा पथकाकडून सरावासाठी सुरुवात केली असून सरावात आकर्षक मनोरा रचून यावर्षी सात ते आठ थरांची दहिहंडी फोडण्याकडे बालगोविंदाचे लक्ष असल्याचे दिसून येते.
उसराई गोविंदा पथक रसायनीचे प्रथम वर्षाचे उदघाटन व दहीहंडीचे पूजन देवा पाटील, पी.पी.पाटील, यादव दिघे, मंगेश पाटील, मंगेश पाटील, राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या गोविंदा पथकाचे प्रमुख नेतृत्व श्रीकांत पाटील यांच्यावतीने करण्यात येणार आहे.देवळोलीतील बाळगोविंद पथक रात्री दहा वाजल्यापासून देवळोली बस थांब्याजवळ सुरुवात केली आहे. यानिमित्ताने परिसरातील सर्व बालगोपालांना थराला या नाही तर धरायला या. असे आवाहन या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवा पाटील यांनी रसायनी उसराई गोविंदा पथकांच्या वतीने केले आहे.