पहिल्या दौर्यासाठी श्रीलंकेत दाखल
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. राहुल द्रविडच्या यशस्वी कारकीर्दिनंतर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी गौतम गंभीरच्या खांद्यावर आली असून आता खर्या अर्थाने गौतम गंभीर युगाची सुरूवात झालेली पाहायला मिळणार आहे.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ पहिल्या दौर्यासाठी सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला आहे. 27 जुलैपासून सुरू होणार्या या श्रीलंका दौर्यात भारतीय संघ 3 टी-20 व 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. यावेळी सूर्यकुमार यादव हा टी-20चा नवा कर्णधार बनला आहे. तर, शुभमन गिलकडे एकदिवसीय व टी-20 संघाचे उप कर्णधारपद सोपवून भविष्याचेही संकेत दिले गेले आहेत. विश्व विजेत्या गौतम गंभीरसमोर आता 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी, 2026चा टी-20 विश्वचषक, 2027चा एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही आव्हाने आहेत. त्याची सुरुवात श्रीलंका दौर्यावरून होत असून ङ्गगंभीरफ युगाची सुरुवात कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.
टी-20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.







