तीन उमेदवार रिंगणात
। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षानेही तीन उमेदवार उभे करून शहरातील पक्षाची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहे.
कै. प्रभाकर नारायण पाटील हे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे केली. त्यामध्ये शालेय इमारती, रस्ते, पाणी आणी इतर लोकोपयोगी कामे करून तालुक्याचा विकास केला. त्यानंतर मीनाक्षी पाटील राज्याच्या राज्यमंत्री असतानाही विकासकामे करून या भागाचा विशेष कायापालट केला.
आ.जयंत पाटील, माजी आ.पंडित पाटील यांचे म्हसळा तालुक्यावर विशेष लक्ष आहे असे तालुका चिटणीस संतोष पाटील यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली निमित्त सांगुन वार्ड नं.11, 12 व 13 मधील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. वार्ड नं 11 मधून अफ्रिन घरटकर, वार्ड नं.12 मधून जमिर तांबे आणी वार्ड नं.13 मधून शीतल सुदाम माळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवार घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संपर्क साधत असून याप्रसंगी तालुका चिटणीस संतोष पाटील, युवाध्यक्ष निलेश मांदा कर, वसीम कोदरे,सुदाम माळी आदि मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.