100 जणांना दिला पहिला डोस
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड शहरातील फातीमा कुलसुम बेगम हॉस्पिटलमध्ये डॉ.दिव्या सोनम यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 18 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवरी 100 जणांना यांचा लाभ मिळाला आहे. 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने लसीसाठी नाव नोंदवता येते. कोव्हिन या वेबसाईटवर गेल्यानंतर अॅण्ड मोअर या बटनावर क्लिक करुन एका मोबाईल क्रमांकाच्या मदतीने चार मुलांच्या लसीकरणासाठी नोंद केली जाऊ शकते. तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही लस देण्याची सुविधा करण्यात आली आहे. तरी या वयोगटातील मुला-मुलींनी मुरुड शहरातील फातीमा कुलसुम बेगम हॉस्पीटल या केंद्रावर जाऊन डोस पुर्ण करावे.असे आवाहन डॉ.दिव्या सोनम यांनी केले.