बेलापूर-मुंबई सुपरफास्ट बोट सेवा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने अतिजलद प्रवासासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवडी नाव्हाशेवा सागरी मार्गाचे काम वेगाने सुरू असून जलवाहतूक हा दुसरा महत्त्वाचा मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई ते बेलापूर ही बोटसेवा सुरू करण्याची सर्व तयारी झाली असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. बेलापूर ते मुंबई असा हा जलवाहतूक मार्ग असून यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून जेट्टीचे कामही पूर्ण झाले आहे. यासाठी अत्याधुनिक व सुसज्ज अशी बोट देण्यात येणार असून 60 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकणार आहेत.

300 रुपये तिकीट?
मुंबई पोर्ट ट्रस्टकडून तिकीट दर निश्‍चित करण्यात आले नसले तरी अंदाजे 300 रुपये असण्याची शक्यता आहे. यातून आरामात प्रवास करता येणार असून रस्ते वाहतुकीत टॅक्सीसाठी आकारण्यात येत असलेल्या दरापेक्षा दर कमी असतील.

Exit mobile version