बेली आदिवासी वाडी होणार प्रकाशमय

| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलीवाडी आदिवासी वाडी करिता विद्युत वीज पोलाकरिता (एन.एस.एस.) नविन सर्विस कनेक्शन या फंडातून निधी मंजूर झाल्याने आदिवासी वाडी होणार प्रकाशमय 

उसरोली ग्रामपंचायत पासुन २किलोमिटर अंतरावर डोंगराल भागातील बेलीआदिवासी समाज आपल्या परिवारासह अनेक वर्षे वास्तव करीत आहे.परंतु विजेच्या प्रकाशासाठी सध्या झगडावे लागत आहे.वीज नसल्याने मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या भवितव्य अंधारात आहे. जिल्हा परिषद शाळेसाठी व ११घरांना आजुन पर्यंत वीज उपलब्ध नसल्याने बांधवांना व महिलांना अंधारातून आपल्या झोपडी पर्यंत प्रवास करावा लागत असल्याचा विदारक दुष्य सध्या पहायला मिळत होता यामुळे अनेक संकटना तोंड द्यावे लागत होते.

तरी या गंभीर समस्येकडे शासनाने लक्ष द्यावे याकरिता  आदिवासी समाज व  ग्रीन वर्कस् ट्रस्ट- गार्गी गीध यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्या कडे व्याध मांडली.ताबडतोब यांची दखल घेत  वृत्तपत्रांत बातमी प्रसिद्ध करण्यात आली .बातमी प्रसिद्ध होताच उपकार्यकारी अधिकारी अभियंता – महादेव दातीर साहेबांनी दखल घेऊन दिड महिन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या माध्यमातून निधी मंजूर करुन आज पोल बसविण्याचा काम सुरू केले.येत्या दोन दिवसात संपुर्ण आदिवासी वाडी प्रकाशमय होईल.

पोल बसविण्याचा काम सुरू आहे येत्या दोन किंवा तीन दिवसात प्रत्येकांला मीटर देऊन वीज कनेक्शन देण्यात येईल त्याकरिता प्रत्येकांनी अर्ज दाखल करावे किंवा जमत नसेल तर त्यात ही आम्ही सहकार्य करु अशी माहिती उपकार्यकारी अधिकारी अभियंता महादेव दातुर यांनी दिली.

Exit mobile version