| बोर्लीपंचतन | उदय विठ्ठल कळस |
श्रीवर्धन तालुक्यातील सर्व खेडोपाड्यातील, ग्रामीण भागातील आणि मुख्य शहरांतील लाभार्थी धान्याचा लाभ घेत आहे. शासन लाभार्थ्यांना धान्य ठरवुन दिलेल्या निकषाप्रमाणे धान्य पुरवठा करीत आहे. त्याप्रमाणे माणसी गहु एक किलो, आणि तांदूळ चार किलो असे आहे, तसेच काही लाभार्थ्यांना धान्य कमी मिळत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने श्रीवर्धन तालुका पुरवठा निरिक्षण अधिकारी रुपाली सुने यांचे निदर्शनास आणून दिली असता त्यांनी श्रीवर्धन तालुक्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानदारांकडून अशा घटना घडु नये अशा सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे धान्य लाभार्थ्यांनी शासनाने ठरवुन दिलेल्या निकषाप्रमाणे धान्याची उचल करावी तसेच ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी आणि जे कोणी धान्य वितरक धान्य कमी देत असल्यास तातडीने धान्य पुरवठा निरिक्षण अधिकारी सुने मॅडम याचे निदर्शनास आणावी अशी विनंती सुने मॅडम यांनी केली आहे.







