पीएम जनमन योजनेचा आदिवासींकडून लाभ

भुतीवलीत महसूल विभागाकडून शिबिर

| नेरळ | वार्ताहर |

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ आदिवासी लोकांनी घ्यावा यासाठी शिबिराचे आयोजन कर्जत महसूल विभागाकडून आयोजित करण्यात आले होते. प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार आणि उप विभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील चिंचवली मंडळातील मौजे भूतिवली येथे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात पीएम जनमन योजनेचा तसेच अन्य योजनांचा लाभ आदिवासी लाभार्थी यांनी घेतला.

शिबिरात आदिवासी लाभार्थी यांना जनमन योजनेशिवाय शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच जातीचे दाखले मिळण्यासाठी 29 अर्ज महसूल विभागाकडे दाखल झाले, तर 11 उत्पन्न दाखले आणि 14 संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले.

सदर शिबिरास कर्जत तहसीलदार डॉ. शितल रसाळ, आसल ग्रामपंचायतचे सरपंच रमेश लदगे, मंडळ अधिकारी वैशाली पाटील, तलाठी अनिल कांबळे, दत्ता ठोकळ, प्रवीण साळुंखे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक काळे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक निरगुडे आणि ग्रामपंचायत मधील कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version