महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

| मुंबई | प्रतिनिधी |

इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला मिळाला आहे. याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार मिळाले.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी बेळगाव येथे एका समारंभात हे पुरस्कार कंपनीच्यावतीने नुकतेच स्वीकारले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, प्रमोद देव, व्ही.पी. राजा, हॅरी धौल, आर.एन. प्रशेर आणि चिंतन शाह उपस्थित होते. कंपनीला इनोव्हेटीव्ह आयटी प्लिकेशन्स इन पॉवर सेक्टरफ या गटातही पुरस्कार मिळाला.

Exit mobile version