| पनवेल | वार्ताहर |
देवळोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र पाटील यांची ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीदरम्यान शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी देवा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम ज. म्हात्रे, माधुरी गोसावी, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, संतोष पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य जगदीश पवार, तसेच पनवेल तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर नाना मोरे, रामेश्वर आंग्रे, चंद्रकांत भोईर, पी. पी. पाटील, मामा मुकादम, देवेंद्र मढवी, संदीप पाटील, भगवान कोंडीलकर, भरत पाटील, जगदीश मुकादम, काजल मंगेश पाटील, मनस्वी मनोज भंडारकर, आदिती अविनाश गव्हाणकर, विनोद एकनाथ पाटील, वैशाली पावसकर, नेहा पाटील, राजेश पाटील, राजेश पाटील, मंगेश नामदेव पाटील, मनोज भंडारकर, धना पाटील, सुशांत पाटील आदींसह मित्र परिवार उपस्थित होते.