सावधान! कोरोनाचा जोर पुन्हा वाढतोय

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढतेय, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 7,830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 233 दिवसांनंतर देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 1 सप्टेंबरला 7,946 रुग्ण आढळले होते. गेल्या चोवीस तासात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असतानाच आता आणखी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट 1.16 मध्ये म्यूटेशन झालं आहे. त्यामुळे नवा सब व्हेरिएंट सापडला आहे. याचे 234 रुग्ण आढळून आलेत. खछड-उजॠ दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, गुजरात, हरियाणासहित 13 राज्यांमध्ये नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.

Exit mobile version