मुख्याध्यापकपदी डॉ. भाईदास पाटील

| खोपोली | प्रतिनिधी |

जनता एज्युकेशन सोसायटी अँड ट्रस्टद्वारा संचालित खोपोली हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी डॉ. भाईदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्याध्यापकपदी पाटील यांची नियुक्ती होताच शहरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

खोपोली शहरातील जनता एज्युकेशन सोसायटी अँड ट्रस्टद्वारा संचालित हिंदी माध्यमाचे नामांकित विद्यालय आहे. या नवीन शैक्षणिक वर्षांपासून संस्थेने डॉ. भाईदास पाटील यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली आहे. पाटील हे हिंदी साहित्याचे अभ्यासक, लेखक, कवी असून, तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण 2020 साठी त्यांची महाराष्ट्र राज्याच्या सदस्यपदीही निवड झालेली आहे. मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय सिंह वर्मा, सचिव एम.आर.पाण्डे, शालेय समितीचे अध्यक्ष राजीव बोहरा तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Exit mobile version