दि.बांच्या स्मृतीदिनी भजनसंध्या कार्यक्रम

। पनवेल । वार्ताहर ।
लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनी पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने महात्मा फुले सभागृहात भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायिका गीता म्हात्रे व सीमा पराड (बडेकर) यांनी विविध बहारदार गाण्यांचे सादरीकरण करीत कार्यक्रमाला रंगत आणली. दरम्यान, वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, 1984 च्या आंदोलनातील रणरागिणी भारती पवार, नगरसेविका दर्शना भोईर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ह.भ.प. एकनाथ आत्माराम पाटील (ज्येष्ठ सनदी लेखापाल व कीर्तनकार), ह.भ.प. विनायक महाराज कांबेकर (ज्येष्ठ कीर्तनकार), ह.भ.प. अरुण बुवा कारेकर (शिल्पकार व भजन सेवा), ह.भ.प. निवृत्तीबुवा चौधरी (संगीत विशारद, भजन सेवा) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव विजय गायकर यांनी केले.

यावेळी दिबांचे सुपुत्र अतुल पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष जे.डी. तांडेल, सचिव बी.पी. म्हात्रे, सहसचिव विजय गायकर, सदस्या मेधा तांडेल, सौ. मनीषा तांडेल, मनस्वी पाटेकर यांच्यासह रायगड जिल्हा निवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष एस.एम.ठाकूर, चंद्रकांत नवगिरे, एस.एम. पाटील, पी.डी. पाटील उपस्थित होते.

Exit mobile version