| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वज फडकविण्याचा मान रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना देण्यात येणार आहे. त्याबाबत मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढले आहे. रायगडचे पालकमंत्रीपद अद्यापही रिक्त असताना अलिबागमधील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमात ध्वज कोण फडकविणार, यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. गतवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना हा मान देण्यात आला होता. त्यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त करतानादेखील वरिष्ठांचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले होते. मात्र, यावर्षी मंत्रालयाने थेट परिपत्रक काढत भरत गोगावले यांचे नाव जाहीर केले आहे.





