भारत पेट्रोलियम, महिंद्रा अंतिम फेरीत दाखल

| मुंबई । प्रतिनिधी ।

भारत पेट्रोलियम, महिंद्रा हे शिवनेरी सेवा मंडळ आयोजित विशेष व्यावसायिक गटात स्व. मोहन नाईक चषकासाठी अंतिम लढत देतील. प्रथम श्रेणी व्यावसायिक गटात स्व. मुकुंद अण्णा जाधव चषकाकरिता सी.जी.एस.टी; श्री स्वामी समर्थ हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. स्थानिक महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती-मुंबई, शिवशक्ती-धुळे, स्वराज्य-उपनगर, होतकरू-ठाणे यांनी उपांत्य फेरीत धडक दिली. शिवशक्ती-मुंबई विरुद्ध स्वराज्य आणि शिवशक्ती-धुळे विरुद्ध होतकरू अशा महिलांत उपांत्य लढती होतील. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर झालेल्या पुरुष विशेष व्यावसायिक गटाच्या उपांत्य सामन्यात भारत पेट्रोलीयमने युनियन बँकेला पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली.

स्थानिक महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या शिवशक्तीने उपनगरच्या महात्मा गांधीचा चुरशीच्या लढतीत पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. शिवशक्ती-धुळे संघाने डॉ. शिरोडकरला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. उपनगरच्या स्वराज्यने नवोदित कर्नाळा स्पोर्ट्सचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली.

Exit mobile version