पेणमध्ये विकसित भारत संकल्प रथयात्रा

| पेण | प्रतिनिधी |

विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे शनिवार, दि.16 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पेण नगरपालिका कार्यालयाच्या पटांगणात आगमन झाले. या संकल्प रथाचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून पेण येथे स्वागत तथा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्वांना विकसित भारताच्या उन्नतीची शपथ देण्यात आली.

केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजना-शहरी, आधार अपडेट, मुद्रा कर्ज योजना, प्रधान मंत्री उज्वला योजना, आदिवासी विकास योजना, दिव्यांगांसाठी पीएम स्वनिधी आदी योजनांचा समावेश होता. स्वनिधी योजना 36, दिव्यांग 48, संकल्प यात्रा आधार सेवा 32, मुंद्रा योजना (एस.बी.आय बँक, बँक ऑफ इंडिया, बॅक ऑफ बडौदा लोन) 36, उज्वल्ला योजना 81, आयुष्यमान भारत कार्ड वाटप 28, आरोग्य योजना महिला 64, पुरूष 155 आदी लाभार्थ्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमामध्ये लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी या योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने पेण शहरासह तालुक्यातील नागरिक हजर झाले होते. हा कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडावा म्हणून पेण नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपहार मेहनत घेतली.

Exit mobile version