• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

भारत सासणेंचे भाषण आणि लेखकाची जबाबदारी

Varsha Mehata by Varsha Mehata
April 25, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
भारत सासणेंचे भाषण आणि लेखकाची जबाबदारी
0
SHARES
350
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रा. अविनाश कोल्हे

गेल्या रविवारी उदगीर येथे भरलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. हे संमेलन येता काही काळ संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणामुळे गाजेल, असा अंदाज आहे. शुक्रवारी 22 एप्रिल रोजी सासणे यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आणि अध्यक्षपदावरून जोरदार भाषण केले.  या भाषणात त्यांनी आजच्या काळाचे वर्णन करतांना ‘भ्रमयुग’ असा शब्द वापरला. त्यांच्या भाषणातील काही वाक्यं उद्धृत करणे गरजेचे आहे. ते भाषणात म्हणाले ‘आपण अशा छद्मबुद्धी विध्वसंकाच्या ताब्यात जात आहोत. असे संकेत मिळायला लागले आहेत. चिंतनशील लेखकाला अशा वेळेस चिंता वाटत असते, वाटली पाहिजे.’ सासणेंची चिंता रास्त आहे. याबद्दल त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून आवाज उठवला, याबद्दल त्यांचे खास अभिनंदन.
प्रत्येक समाजातील लेखक/ कलावंतांवर एक खास जबाबदारी असते. ती जबाबदारी म्हणजे त्यांनी कोणाचीही आणि कशाचीही तमा न बाळगता सत्य कथन केले पाहिजे आणि सत्ताधार्‍यांच्या डोळ्याला डोळा भिडवत जाब विचारला पाहिजे. मी येथे जाणिवपूर्वक ‘कोणत्याही सत्ताधार्‍याला’ असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ असा की सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही राजकीय तत्वज्ञानाचे पाईक असो, सर्वांना सत्तेचे केंद्रीकरण करायला आवडते. त्याचप्रमाणे त्यांना आविष्कार स्वातंत्र्यावर बंधनं घालायला आवडतात. हे समजून घेण्यासाठी आपल्याला विसाव्या शतकातील जगाच्या इतिहासवर नजर टाकावी लागते.
ही चर्चा सुरू करण्याअगोदर विसाव्या शतकात सुरू झालेली राजकीय तत्वज्ञानाची लढाई समजून घेतली पाहिजे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाने जगाच्या इतिहासाला नवे वळण लागले. मार्क्सवादाने जगाची आर्थिक पुनर्रचना करण्याचे स्वप्न बघितले. श्रमजीवी वर्ग निर्माण करत असलेल्या संपत्तीचं न्याय्य वाटप झालं पाहिजे, अशी मागणी करत ‘जगातल्या कामगारांनो, एक व्हा’, असे आगळेवेगळे आवाहन केले. यातून प्रेरणा घेऊन लेनिनने झारशाही खाली असलेल्या रशियात ऑक्टोबर 1917 मध्ये कामगारक्रांती केली. पुढे या क्रांतीने स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली आर्थिक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आणि अवकाश संशोधनात अभूतपूर्व प्रगती करून दाखवली. त्यामुळे अमेरिका, इंग्लंड, फ्रांस वगैरे भांडवलशाही देशांचे धाबे दणाणले. या प्रगतीसाठी स्टॅलिनने आणि नंतर चीनमध्ये माओने लाख्खो निरपराध शेतकर्‍यांचा बळी दिला वगैरे आरोप व्हायला लागले. सर्वांगिण प्रगती साधत असतांना स्टॅलिनने तसेच माओने राजकीय सत्तेचे केंद्रीकरण केले. या केंद्रीकरणाच्या आणि त्यातून होत असलेल्या अन्याय/अत्याचारांच्या विरोधात, आविष्कार स्वातंत्र्याच्या झालेल्या संकोचाच्या विरोधात तेथील साखारावसारख्या शास्त्रज्ञाने आणि सोल्झेनित्सीन, बोरीस पास्तरनॅकसारख्या लेखक/ कलाकारांनी आवाज उठवला होता.
रशियात हे सर्व घडत असतांना अमेरिकेतील राज्यकर्ते आनंदात होते. मार्क्सवादाची परस्पर बदनामी होतांना पाहून भांडवलशाही देशांतील सत्ताधारी वर्गाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. दुसरे महायुद्ध 1945 साली संपले आणि त्यानंतर लवकरच अमेरिकेत सिनेटर मॅकार्थी युग सुरू झाले. सिनेटर जोसेफ मॅकार्थींच्या (1908-1957) नेतृत्वाखाली अमेरिकेतील काँगे्रसने (म्हणजे आपल्याकडील संसद) एक समिती गठीत केली आणि कम्युनिस्टांबद्दल आपुलकी वाटणार्‍या लेखक/कलावंतांना त्रास द्यायला सुरूवात केली. मकार्थी महाशयांनी फेब्रुवारी 1950 मध्ये एका भाषणात असे नमुद केले होते की त्यांच्याजवळ अशा लेखक/कलावंतांची यादी आहे, ज्यांना कम्युनिझमबद्दल प्रेम वाटते. यानंतर त्यांनी असे आरोप केले की हे कम्युनिस्ट आता अमेरिकन सरकारच्या अनेक विभागात शिरले आहेत आणि आतून अमेरिकन सरकारचे धोरण कम्युनिझमला पोषक कसे होईल, यासाठी प्रयत्न करत असतात. मॅकार्थीने त्रास दिलेल्यांत आर्थर मिलर, चार्ली चॅप्लीन यांच्यासारखे कलाकार, लेखक होते.
या संदर्भात दोन घटनांची नोंद घेतली पाहिजे. 1949 साली सोव्हिएत युनियनने अणुबॉम्ब स्फोट केला आणि या क्षेत्रातील अमेरिकेची एकाधिकारशाही मोडून काढली. त्याचप्रमाणे 1949 साली माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. या दोन घटनांमुळे जगभर कम्युनिस्ट आक्रमक झाले होते. परिणामी हॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांनी ‘आम्ही कम्युनिस्ट विचारांच्या नट नटींना काम देणार नाही’ असे जाहिर केले. यामुळे जगभर अमेरिकेची बदनामी झाली. स्टॅलिन किंवा माओच्या दडपशाहीबद्दल हिरीरीने बोलणारे लेखक/कलावंत अमेरिकेतील मॅकार्थी प्रकरणाबद्दल एक शब्द उच्चारायला तयार नव्हते. येथे अनेक लेखकांचे पितळ उघडे पडले.
असा प्रकार 1975 ते 1977 आपल्या देशात लागू करण्यात आलेल्या अंतर्गत आणिबाणीच्या काळात घडला. आणिबाणी सुरू असतांना अनेक लेखक/ कलावंतांनी आणिबाणीला पाठिंबा दिला होता किंवा मूग गिळून गप्प राहाणे पसंद केले होते. हेच गप्प बसलेले लेखक आणिबाणी उठल्यानंतर केंद्र सरकारवर कडक शब्दांत टिका करायला लागले होते. यातील दुटप्पी मानसिकता उघड आहे.
असा दुटप्पीपणा जातिवंत कलाकाराचे लक्षण नाही. जातिवंत कलाकार नेहमी सत्याच्या बाजूने आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूने उभा राहतो. सत्तेत कोणता पक्ष आहे, कोणते राजकीय तत्वज्ञान आज सत्तेच्या जागी विराजमान झालेले आहे, याकडे नजर ठेवत सच्चा लेखक कलावंत आपली भूमिका ठरवत नाही.
या संमेलनात इतरत्र झालेल्या काही भाषणांचासुद्धा परामर्श घेणे गरजेचे आहे. खास करून त्यातील महत्त्वाची काही वाक्यं जी महत्वाच्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली आहेत. गोव्याचे जेष्ठ लेखक दामोदर मावजो म्हणाले ‘सत्तेला माज चढला की साहित्यावर निर्बंध लादले जातात’. हे अर्थसत्य आहे. जागतिक साहित्याचा विचार केला तर असे दिसते की बंदी लादण्याची कारणे अनेक आणि वेगवेगळी असू शकतात. उदाहरणार्थ 1928 साली इंग्लंडने डी. एच. लॉरेन्सच्या ‘लेडी चॅटर्लीज लव्हर’ या कादंबरीवर बंदी घातली होती. लॉरेन्सच्या कादंबरीत संभोगाची वर्णन अश्‍लिल स्वरूपाची आहेत, असा आक्षेप होता. या बंदीत सत्ताधार्‍यांचा माज कोठे दिसून येतो? तसेच भारताने 1988 साली सल्मान रूश्दीच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ वर बंदी घातली होती. याचे कारण या कादंबरीमुळे भारतात हिंदू- मुस्लिम दंगे भडकतील, असे राजीव गांधी सरकारला वाटले होते. यात सत्ताधा-यांचा माज कोठे दिसतो?
या संमेलनात ‘लेखक आणि लोकशाही मूल्ये’ या परिसंवादात बोलतांना राजकुमार तांगडे म्हणाले ‘कोणाच्या तरी चरणी साहित्य अर्पण करणारे पोटार्थी लेखक कसली मूल्यं जपणार?’. येथे तांगडे थोडी गल्लत करत आहेत. आजही आपल्या देशात सर्वात मोठा मालक म्हणजे सरकार. येथे ‘सरकार’ या शब्दात केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था वगैरेंचा समावेश होतो. या नोकर्‍यांतील सेवाशर्तीत ‘सरकारवर टिका करणार नाही’ असं स्पष्ट नमुद केलेलं असतं. नोकरी स्वीकारतांना लेखक/कलाकाराला ही सेवाशर्त माहिती असते. ती मान्य केल्यावर मग लेखकाने शासनावर टिका करावी अशी अपेक्षा कशी ठेवता येईल? सरकारी नोकरीत असलेले अनेक लेखक निवृृत्त झाल्यावर सरकारच्या विरोधात बोलतात बोलतात, यामागे हे वास्तव आहे.  दुसरं म्हणजे भारतासारख्या गरीब देशांत अजुनही लेखक/कलावंत फक्त कलेच्या आधारे जगू शकत नाही (याला काही अपवाद आहेत.) एकेकाळी याला ‘खासगी कंपनीतील नोकरी’ हा पर्याय समोर आला होता. पण आज असे दिसते की खासगी कंपनीच्या नोकरीत राहून सरकारवर टिका करता येईलच, याची खात्री देता येत नाही. अनेक बड्या भांडवलंदारांचे सरकारशी साटेलोटे असते. अशा खासगी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी जर सरकारवर टिका केली तर ती खासगी कंपनी अशा कर्मचार्‍यांना नारळ द्यायला मागेपुढे बघत नाही.
दोनचार वर्षांपूर्वी काही नामवंत पत्रकारांना एका टीव्ही चॅनेलने तडकाफडकी काढून टाकले होते. याचा अर्थ असा की आपल्या देशात लेखक स्वतःच्या जगण्यासाठी अनेक पातळ्यांवर छुप्या पद्धतीने गुलाम असतो. असे असले तरी अशा स्थितीतही एके काळी अनेक लेखकांनी सरकारला धारेवर धरणारे लेखन केलेले आहे. यात लेखक कोणाची नोकरी करतो हा मुद्दा नसून लेखक स्वतःच्या मूल्यांशी कितपत प्रामाणिक आहे, हा आहेे. आजच्या वातावरणात संमेलनाध्यक्ष भारत सासणेंचे भाषण म्हणूनच महत्वाचे आहे. असे असले तरी त्यांनी ‘आविष्कार स्वातंत्र्याच्या संदर्भात लेखकाची सर्वकालिन जबाबादारी’चा उल्लेख करायला हवा होता, असे वाटते. जगभरचे आणि सर्व प्रकारचे सत्ताधारी नेहमी आविष्कार स्वातंत्र्याच्या विरोधात असतात, हे त्रिकालाबाधित सत्य त्यांच्या भाषणातून अधोरेखित व्हायला हवे होते.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

कोर्लई येथे महिलेस मारहाण

Next Post

पुढील पिढीला इतिहासच मार्गदर्शक ठरू शकेल- पुंडलिक पाटील

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
पुढील पिढीला इतिहासच मार्गदर्शक ठरू शकेल- पुंडलिक पाटील

पुढील पिढीला इतिहासच मार्गदर्शक ठरू शकेल- पुंडलिक पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?