संदीप वारगे यांना भारत विभूषण प्रदान

हरियाणाच्या नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने केला गौरव

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक संदीप दत्तात्रेय वारगे यांना यावर्षीचा भारत विभूषण हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. डिस्ट्रीक गव्हर्नर अमरचंद शर्मा यांच्या हस्ते अलिबाग येथे सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, हरियाणा या संस्थेकडून शैक्षणिक, सामाजिक उपक्रमातील गुणवत्तेच्या आधारे राष्ट्रीय भारत विभूषण सन्मान दरवर्षी दिला जातो. विविध क्षेत्रातील मान्यवरांना 30 पुरस्कार या संस्थेमार्फत दिले जातात. सन 2022-23 या वर्षासाठी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मोहिमेत सहभागी करून घेणे, तसेच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची गुणवत्तेच्या आधारे हा सन्मान वारगे यांना प्राप्त झाला आहे.

सन 2023-24 साठी लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेन्टेनियल या आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा हॉटेल सुरूची, कुरूळ-अलिबाग येथे आयोजित केला होता. त्यावेळी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्यापन करण्यासाठी डिजिटल स्कूल कमीत कमी खर्चात कशी निर्मिती करता येईल यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली व बऱ्याचशा केंद्रांना भेटी देऊन स्वतः डिजिटल वर्ग सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, आंतरराष्ट्रीय योगा वर्ल्ड रेकॉर्ड, ऑनलाईन अमेरिकेच्या नासाचे ई लर्निंग प्रमाणपत्र अशी राष्ट्रीय कामगिरी त्यांच्या नावावर आहे. वारगे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 15 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रमाणपत्रे मिळाले आहेत. उपग्रह निर्मितीच्या मोहिमेत चार विद्यार्थ्यांना 60 हजार रुपयांची शिष्यवृत्ती, तीन टॅबलेट मिळवून दिल्याबद्दल चेन्नई येथील मार्टिन ग्रुप या संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते व उत्तम कार्याबद्दल मोहिमेचे शाश्रज्ञ डॉ.आनंद मेगलींगम यांच्या हस्ते तामिळनाडू येथे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा प्रांतपाल अमरचंद शर्मा, उप जिल्हा प्रांतपाल एन. आर. परमेश्वरन, ला.अनिल म्हात्रे, ला.प्रियदर्शिनी पाटील, ला.प्रविण सरनाईक, ला.नयन कवळे, माजी अध्यक्ष ला.ड.कला पाटील, ला.संजय रावळे (नवनियुक्त अध्यक्ष), डॉ.ॲड. निहा राऊत, सुनील भोपळे उपशिक्षणाधिकारी रा.जि.प. अलिबाग व लायन्स क्लब ऑफ श्रीबागचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version