रिजवाना सय्यद यांना भाषाभूषण पुरस्कार

। म्हसळा । वार्ताहर ।
अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळाच्या हिंदी, मराठी भाषा विषयाच्या शिक्षिका रिजवाना असिफ सय्यद यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

काठमांडू येथे संपन्न झालेल्या नेपाल-भारत हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनाच्या भव्य कार्यक्रमात सय्यद यांना संमेलन समिती प्रमुख विजयकुमार तिवारी, केंद्रीय समन्वयक उस्मान मुलानी, स्वागताध्यक्षा नेपाल डॉ.संगीता ठाकुर, प्रमुख संयोजक कैलास जाधव, प्रमुख संयोजक नेपाल डॉ.राधेशाम ठाकूर यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अंजुमन हायस्कूलच्या शिक्षिका प्रा.रिजवाना सय्यद यांचे हिंदी,मराठी, उर्दु आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांचे मराठी आणि हिंदी भाषेतील अनेक प्रकारचे लेखन साहित्य प्रसिद्ध आहे. या यशाबद्दल स्कूल कमिटी चेअरमन नासीर मिठागरे, माजी चेअरमन फझलभाई हळदे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य महंमद तांबे, शिक्षक यानीं त्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version