सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत परीमंडळ 2 पनवेल येथील सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.

यापूर्वी असलेलले सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांची आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे सहाय्य्क पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version