म्हसळयातील भरवस्तीत भेकर घुसले; नागरिकांची भेकराला पाहायला गर्दी

वनविभागाचे सर्तकतेने जखमी भेकराला जिवदान
। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा शहरांत सायंकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान म्हसळा- श्रीवर्धन हमरस्त्यावर, भरवस्तीत भेकर येऊन बंद शटरला जोरदार धडकल्याने जखमी झाले, काही वेळातच नागरिकांची प्रचंड गर्दी झाली भेकर जातीचे श्वापद नागरी वस्तीत आल्याचे कळताच म्हसळयाचे वनपाल संजय नाईकनवरे तात्काळ घटनास्थळी पोहचले त्यानी पशुधन पर्यवेक्षक डाॅ.बुलबुले यांच्या माध्यमातून उपचार करून भेकराला जिवदान दिले. यावेळी परिक्षेत्रवन आधिकारी संजय पांढरकामे यानी मार्गदर्शन, वनरक्षक भिमराव सुर्यतळ यानी मदत केली.

तालुक्यात एकुण ५५९ १.०४० हेक्टरवर वनविभागाचे क्षेत्र आहे, यातील बहुतांश क्षेत्रात वन्य श्वापदांचा मुक्त संचार असतो. यामध्ये बिबटयांचे बरोबरीनेच रानडुक्कर, गवा, भेकर व अन्य प्राणी असतात. गाव खेडयाच्या परीसरांत ही श्वापदे मोठ्या प्रमाणात येतात. स्तनी वर्गाच्या समखुरी गणातील मृग (सर्व्हिडी) कुळाच्या म्युंटिअ‍ॅकस प्रजातीतील सर्व प्राण्यांना भेकर (म्युंटजॅक) म्हणतात. श्रीवर्धन, म्हसळ्यात स्थानिक भाषेत खिट खिटा” असेही म्हणतात तो मूळचा भारत, आग्नेय आशिया आणि दक्षिण चीनमधील असून त्याच्या काही जाती इंग्लंड आणि फ्रान्समध्ये प्रस्थापित झाल्या आहेत. धोक्याची जाणीव झाल्यानंतर तो भुंकल्यासारखा आवाज काढतो, म्हणून त्याला ‘बार्किंग डियर’ किंवा ‘भुंकणारे हरीण’ असेही म्हणतात.

तालुक्यातील बहुतांश गावांमधील लोकांचा वनसरंक्षणात सहभाग वाढावा यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण करण्याचा वन विभागाचा उपक्रमशील कार्यक्रमातून संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून वने आणि वन्यजीवांचे सरंक्षण तसेच गावांचा विकास हा दुहेरी हेतू साध्य होत असतो यामुळे म्हसळा तालुक्यातील वनसंपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

– बाळकृष्ण गोरनाक, सेवानिवृत्त वन आधिकारी.
Exit mobile version