दिघेवाडी महिला कब्बडी स्पर्धेत भिल्लेश्वर किहीम प्रथम

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |

नांदगाव पंचक्रोशीतील दिघेवाडी येथे प्रथमताच भव्यदिव्य जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत महिला कबड्डी संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी भिल्लेश्वर किहीम हा संघ ठरला या संघास रोख रक्कम 11001 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल या संघास रोख रक्कम 7001 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक दत्तात्रेय क्रीडा मंडळ पनवेल आणि चतुर्थ क्रमांक सुवर्ण गणेश दिवेआगर या दोन्ही संघास प्रत्येकी रोख रक्कम 5001 व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट खेळाडू चैताली म्हात्रे, उत्कृष्ट चढाई ममता चव्हाण, उत्कृष्ट पकड पूजा ,पब्लिक हिरो सिया काळे या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे समालोचन संजय थळे यांनी केले.

Exit mobile version