हेटवणे क्रिकेट स्पर्धेत भीमसेवा चिंचवली प्रथम

| कोलाड | वार्ताहर |

को .वि .ना .अं .बॉ .क्रि .असोसिएशन च्या वतीने जय बजरंग क्रीडा मंडळ हेटवणेतर्फे शनिवार (दि.27) क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. सामन्याचे उद्घाटन दर्शन तेलंगे यांचे हस्त करण्यात आले. यावेळी अनिल निकम, अमीर तेलंगे, राहुल शिंदे आणि हेटवणे गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेत भीमसेवा चिंचवली संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर व्दितीय क्रमाक हेटवणे, तृतीय क्रमांक रोहारोड यांनी पटकावला. स्पर्धेत प्रदीप सावत उत्कृष्ट फालदाज भीमसेवा चिंचवळी, उत्कृष्ट गोलंदाज अमित तर हेटवणे संघाचा विनोद पोटले सामनावीर ठरला. हे सामने पार पाडण्यासाठी जय बजरंग क्रीडा मंडळ हेटवणे संघाच्या सर्व सभासदांनी मेहनत घेतली.

Exit mobile version