भिवंडीत राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई शहरचे संघ जाहीर

मुंबई | प्रतिनिधी |
काल्हेर-भिवंडी येथे दि. 28 फेब्रुवारीपासून होणार्‍या 69व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेकरिता मुंबई शहर कबड्डी संघटनेने आपले दोन्ही संघ जाहीर केले. विजय बजरंग व्यायाम शाळेच्या अक्षय उगाडे कडे पुरुषांच्या, तर शिवशक्ती महिला-अ संघाच्या पूजा यादव कडे महिलांच्या संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली.
नोहेंबर 2021 मध्ये झालेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतील कामगिरी वरून हे संघ निवडण्यात आले आहेत. भारतीय क्रीडा मंदिर वडाळा येथे या संघाचा सराव सुरू असून दि. 28 रोजी सकाळी हे संघ स्पर्धेकरिता काल्हेर-भिवंडीला रवाना होतील. निवडण्यात आलेले हे संघ मुंबई शहर कबड्डी असो.चे सरकार्यवाह विश्‍वास मोरे यांनी आज प्रसार माध्यामाकरिता जाहीर केले. दोन्ही संघ खालील प्रमाणे.
पुरुषांचा संघ :- 1)अक्षय उगाडे(संघनायक)- विजय बजरंग व्यायाम शाळा, 2)ओमकार मोरे-जय भारत मंडळ, 3)सिद्धेश पिंगळे-गोलफादेवी मंडळ, 4)अक्षय सोनी-विजय क्लब, 5)प्रफुल्ल कदम-गुड-मॉर्निग स्पोर्ट्स, 6)धनंजय सरोज-गोलफादेवी मंडळ, 7)राकेश भोसले-अंकुर स्पोर्ट्स, 8)हर्ष लाड-विजय नवनाथ मंडळ, 9)प्रथमेश पालांडे-दुर्गामाता स्पोर्ट्स, 10)मयूर शिवतरकर-अमर भारत मंडळ, 12)विजय दिवेकर-विजय क्लब. प्रशिक्षक :- रामचंद्र जाधव व्यवस्थापक :- दिनेश पाटील.
महिलांचा संघ :- 1)पूजा यादव(संघनायिका)-शिवशक्ती महिला(अ), 2)मेघा कदम-डॉ.शिरोडकर स्पोर्ट्स, 3)पौर्णिमा जेधे-शिवशक्ती महिला(अ), 4)प्रतिक्षा तांडेल-शिवशक्ती(ब), 5)श्रावणी घाडीगांवकर-डॉ.शिरोडकर स्पोर्ट्स, 6)जागृती घोसाळकर-गोलफादेवी मंडळ, 7)साधना विश्‍वकर्मा- शिवशक्ती महिला(ब), 8)श्रद्धा कदम-अमरहिंद, 9)प्रीती हांडे-जिजामाता, 10)योगिता राऊत-जिजामाता, 11)प्रतिक्षा घाणेकर-श्री स्वामी समर्थ, 12)विशाखा राऊत-विश्‍वशांती. प्रशिक्षक :- आनंदा शिंदे व्यस्थापिक :- सुनंदा बुरकुल.

Exit mobile version