विविध विकासकामांचे प्रीतम म्हात्रेंच्या हस्ते भूमीपूजन

| पनवेल | वार्ताहर |
प्रभाग क्र. 18 मधील पाडा मोहल्ला येथील अंतर्गत गल्ली काँक्रिटीकरण करणे आणि भुसार मोहल्ला येथील गटार बांधणे हे काम सहकारी नगरसेवकांसह विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा करून काम मंजूर करून घेतले. या कामाचे भूमीपूजन पार पडले.

तसेच प्रभाग क्र 18 मधील नवीन पनवेल सेक्टर 3 येथील प्लॉट नं.56 येथील उद्यानात प्रीतम म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीचा वापर करून बांधण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे व नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 3, प्लॉट 57 येथील उद्यानात बांधण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण पार पडले.

यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्यासह नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत, माजी नगरसेवक डी.पी. म्हात्रे, शेकाप नेते प्रभाकर कांबळे, युवा नेते अतुल भगत, मंगेश अपराज, अविनाश मकास, दर्शन कर्डीले, रोहन गावंड, संदेश मोहन तसेच ज्येष्ठ नागरिक, सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version