गोदामाच्या बांधकामाचे भूमीपूजन

। अलिबाग । वार्ताहर ।
ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या बांधकामाचे भूमीपूजन मौजे शितोळे, ता.पेण येथे (दि.2) जानेवारी पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले. यावेळी सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपजिल्हाधिकारी, स्नेहा उबाळे, ज्ञानेश्‍वर खुटवळ, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे,उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, दादर सागरी पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील, उद्योजक राजू पिचिका, डी.एम.पाटील, चेतन पाटील, प्रकाश झावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन पेण तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे यांनी केले.

Exit mobile version