हरिहरेश्वर मंदिर सुशोभिकरणाचे भूमिपूजन

| तळा | वार्ताहर |

पर्यटन विकास अंतर्गत तळा शहरातील प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर मंदिर व महादेव तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, या कामाचे भूमिपूजन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडले. यांसह साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत बामणघर बौद्धवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, आंबेळी बौद्धवाडी समाज हॉल बांधणे, तळा बौद्धवाडी येथे समाज हॉल बांधणे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 येथील पिंपळवार सुशोभिकरण करणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष नाना भौड, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सर्व नगरसेवक यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version