शेलू बांधीवली रस्त्याचे भूमिपूजन

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत मधील बांधिवली गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या रस्त्याच्या कामासाठी 75 लाखाचा निधी मंजूर आहे. आ. महेंद्र थोरवे यांचे हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

शेलू ग्रामपंचायतमधील रेल्वे स्थानक ते रेल्वे फाटक या रस्त्याचे काँक्रिटकरण करण्याचे काम मुंबा महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे. त्यानंतर आता रेल्वे स्थानक पासून बांधिवली गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम मंजूर करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार आ. थोरवे यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मधील बाह्य जोड रस्ते कार्यक्रम अंतर्गत निधी मंजूर करून आणला आहे. या रस्त्याचे बांधकाम करण्याच्या कामाचा शुभारंभ कर्जत त्यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी शिवाजी खारीक, आरती भगत, अमर मिसाळ, नरेश मसणे, मंगेश म्हसकर, प्रसाद थोरवे, संकेत भासे, अंकुश दाभणे, जाबिर नजे, अर्जुन तरे, भाऊ भोईर, शंकर तरे, दत्तात्रय पाटील यांच्यासह मनोहर मसणे उपस्थित होते.

Exit mobile version