उकरुळ पाणी योजनेचे भूमिपूजन; महिलांनी मानले विशेष आभार

| कर्जत | वार्ताहर |

केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या जल जीवन मिशन अंतर्गत कर्जत तालुक्यातील उकरुळ गावाला पाणी मिळणार. सोमवारी या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत पाणी योजना मार्गी लागल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.

उकरुळ गावाच्या पाणी योजनेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत 3 कोटी 72 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. तसेच, फायरविंग इन्फ्राकॉन सर्व्हिसेस या कंत्राटदारांच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू घारे यांच्यासह सरपंच नीलिमा थोरवे ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी आणि उकरुळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणी टंचाईनंतर गावासाठी चांगली योजना असावी, अशी उकरुळ ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती. अखेर डिसेंबर महिन्यात ती मार्गी लावण्यात यश आले आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भूमिपूजन रखडले होते. सोमवारी मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ते करण्यात आले आहे. यामुळे विशेषतः महिलांनी आभार व्यक्त केले. उकरुळ पाणी योजनेचे अनेकांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यासाठी कोणीही राजकारण करू नये. कामे करणार्‍यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. तसा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा घारे यांनी दिला.

Exit mobile version