आ. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील बेलकडे, नागाव व पाल्हेमध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन शुक्रवारी, (दि.15) मार्च रोजी करण्यात येणार आहे. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, बेलकडेचे सरपंच संजय पाटील, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निखिल मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, सदस्य राजेंद्र मयेकर आदी मान्यवरांसह आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला उपस्थित राहणार आहेत.
आ. जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून आणि 15 व्या वित्त आयोग निधीतून विविध विकासकामे केली जाणार आहेत. त्यामध्ये बेलकडे येथील तलाव ते रुपेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता, पिंडदान निवारा शेड, बेलकडे शाळेच्या पटांगणात पेव्हर ब्लॉक बसविणे, गजानन म्हात्रे यांचे घर ते दंडाकडे जाणार्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता होणार आहे. तसेच 15 व्या वित्त आयोगातून नागाव येथील सोमेश्वर मंदिर ते नागाव बंदरपर्यंत रस्ता तयार करण्यात येणार आहे. या विविध विकासकामांचे भूमीपूजन दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास होणार आहे. त्यानंतर पाल्हे अंतर्गत रस्त्याचे भूमीपूजन केले जाणार आहे.
नागाव बंदरच्या अंगणवाडीचे होणार उद्घाटन निसर्ग चक्रीवादळामुळे नागाव बंदरातील अंगणवाडीचे नुकसान झाले होते. बालकांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी शेकापच्या माध्यमातून अंगणवाडीचे काम करण्यात आले होते. या अंगणवाडीचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.