भुवनेश्‍वर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा

पंडित पाटील यांची वचनपूर्ती, क वर्गात समावेश
| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.क्षेत्र भुवनेश्‍वरला पर्यटन स्थळाचा दर्जा सरकारच्यावतीने देण्यात आला आहे.यासाठी माजी आम.पंडित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.क वर्गात या पर्यटन स्थळाचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे विकासाचा मार्ग खुला झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे.त्या मान्यतेचे पत्र माजी आम.पंडित पाटील यांच्या हस्ते भुवनेश्‍वर ट्रस्ट चे अध्यक्ष व सदस्य याना सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमास जि.प. प्रतोद अ‍ॅड.आस्वाद पाटील, सदस्या भावना पाटील चित्रा पाटील तसेच पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री.क्षेत्र भुवनेश्‍वर ला पर्यटन स्थळाची मान्यता मिळाल्याने मंदिराचे ट्रस्टी व ग्रामस्थांनी आदरणीय पंडित पाटील यांचे जाहीर आभार मानले.तसा शब्द पंडित पाटील यांनी आमदारकीच्या कार्यकाळात भुवनेश्‍वर मंदिर ट्रस्ट आणि 18 गाव कमिटीला दिलेले होते.त्याची पुर्तता केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

श्री क्षेत्र भुवनेश्‍वराचा सर्वांगिण विकास करण्याची ग्वाही मी दिलेली होती.ती आता पूर्ण होणार आहे.याचे समाधान सर्वात मोठे आहे.भविष्यात हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जाईल.त्यासाठी सरकारकडून योग्य तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. – पंडित पाटील, माजी आमदार

Exit mobile version