। कोर्लई । वार्ताहर ।
आ.जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून मुरुड तालुक्यातील शिघ्रे-नवीवाडी येथे सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा उपस्थित करण्यात आले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, विजय गिदी, तालुका पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत कमाने, तुकाराम पाटील, अजित कासार, नम्रता कासार, उसरोली सरपंच मनिष नांदगावकर, श्रीकांत वारगे, अमोल पाटील, गणेश नाक्ती, चंद्रकांत बेडेकर यांसह पदाधिकारी व कार्यकते पदाधिकारी उपस्थितीत होते.