मिरचोलवाडी येथे हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन

आ. जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर
। नेरळ । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाच्या प्रयत्नाने आणि सरचिटणीस आ. जयंत पाटील व जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या माध्यमातून कंळब ग्रामपंचायतीमधील मिरचोलवाडील येथील हनुमान मंदिराच्या सभागृहासाठी रायगड जिल्हा नियोजन मंडळाने निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंदिराचे भूमीपूजन नुकतेच जि.प. सदस्य नारायण डामसे यांच्या करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी शेकापचे प्रभारी तालुका चिटणीस श्रीराम राणे, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पेमारे, शेकापचे कळंब जिल्हा परिषद गटाचे चिटणीस पांडुरंग बदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबन भालेराव, कर्जत तालुका पुरोगामी युवक संघटनेचे कार्याध्यक्ष महेश म्हसे, वारे ग्रामपंचायत सरपंच योगेश राणे, कळंब ग्रामपंचायत सदस्या नीलम ढोले, माजी सरपंच कृष्णा बुवा बदे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते भरत ऐनकर, कळंब जिल्हा परिषदेचे पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष नितीन गायकर यांच्यासह कळंब ग्रामपंचायत आणि मिरचोलीवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version