। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे जवळील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील निडी येथे माजी आ.धैर्यशील पाटील व राजिपच्या बांधकाम सभापती निलिमा पाटील यांच्या सहकार्यातून गावातील 270 मीटर लांबी असलेला अंतर्गत रस्त्यासाठी मूलभूत सुविधा योजनेंतर्गत 10 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. गुरुवारी (दि.25) या रस्त्याचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी कोंडगावच्या सरपंच कमल बुरूमकर, उपसरपंच अनंत वाघ, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निखिल मढवी, सदस्या प्रणाली मढवी, यशवंत शिद, ग्रामसेवीका विद्या घरत, मधुकर मढवी, वामन मढवी, परशुराम मढवी, बाळाराम मढवी, मिथुन मढवी, योगेश मढवी, कृष्णा भोय आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.