। उरण । प्रतिनिधी ।
पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते रांजणपाडा- जासई येथील स्मशानभूमीचे भुमीपूजन करण्यात आले. जेएनपीटीला जोडलेल्या रेल्वे लाईनच्या चौपदीकरणाचे काम सुरू असल्याने रांजणपाडा येथील जुनी स्मशानभूमी अडथळा ठरत होती. त्यामुळे नवीन स्मशानभूमी टाटा कंपनीने बांधून देण्याचे मान्य केले होते. त्याचे भूमिपूजन गुरुवारी (दि.23) पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जासई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच धीरज घरत, उरण तालुका शेकाप युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, एकनाथ घरत, रुपाली पाटील, पूजा कांबळे, मुरलीधर ठाकुर, रमेश पाटील, प्रकाश पाटील, नारायण घरत, सुरेश पाटील, महादेव पाटील, सुदर्शन पाटील, मिथून म्हात्रे, ममता म्हात्रे, चंद्रकांत नाईक, शाम पाटील, संतोष ठाकुर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.