पाणीपुरवठा योजनेतील कामाचे भूमिपूजन

| वेणगाव | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या योजनेतील कामांचे भूमिपूजन अ‍ॅड. स्वप्निल पालकर यांच्या हस्ते रविवार, दि. 20 जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात करण्यात आले.

देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचले पाहिजे, हे केंद्र सरकारचे धोरण आहे. केंद्र सरकार जलजीवन मिशन योजनेचा मोठे वेणगावातील मराठा सवर्ण वस्ती, बौद्ध वस्ती, आदिवासी वस्तीमधील नागरिकांना लाभ व्हावा यासाठी माजी आ. सुरेश लाड व रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या सहकार्याने अ‍ॅड. स्वप्निल पालकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. या योजनेंतर्गत गावातील प्रत्येक घटकाला समान मूल्यमापन करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. स्वप्निल पालकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी सुभाष गवळे, उत्तम सोनवणे, संजय गवळे, विनोद भालेराव, आनंद सोनवणे, दिनेश पालकर, वैभव पेठे, सुरेश गायकवाड, समीर पेठे, शरद पालकर, पराग अंबावणे, दिपक थोरवे, राजू कुडेकर, सुभाष पालकर, सुरेश पालकर, मंगेश पालकर, उमेश सावंत, गौतम सोनवणे, मंगेश केलटकर, किरण पालकर, शरद वाळकू पालकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version