चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंड्यात शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचे हस्ते भुमिपुजन तसेच शुभारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी थेरोंडा व रेवदंडा विभागातील शेकापक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

रेवदंडा वाडी मोहल्ला येथे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या निधीतून बनविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक रस्ताचा शुभारंभ, वरसोलकर व जयंत शिंदे यांच्या घरासमोरील रस्ताचे भुमिपुजन कार्यक्रमशेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचे हस्ते पार पडले. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी पेव्हर ब्लॉकचे फित कापून तसेच शरद वरसोलकर व जयंत शिंदे यांच्या समोरील रस्ता नुतनीकरण भुमिपुजन श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी थेरोंडा येथील तिन रस्त्याचा शुभारंभ, थेरोंडा बाजारपाड्यातील रस्ता नुतनीकरण 0 रेवदंडा येथील व्यायामशाळेला निधी देणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी शेकापचे रेवदंडयातील जेष्ठ कार्यकर्ते सदाशिव मोरे, सुरेश खोत, शरद वरसोलकर, मुज्जफर मुकादम, जावेद मुकादम, बाळू नवखारकर, सलिम गोंडेकर, संदिप खोत, संतोष मोरे, राजन वाडकर, खलिल तांडेल, निलेश खोत, राहूल गणपत, संतोष जाधव, राजू काटेकर, मिलिंद वाडकर, विजय चौलकर, महेश सुडकू, जयेश जंगली, सनंद सुडकू, पंढरीनाथ चौलकर,अभय ठाकूर, जयेश कोंडे, उमेश कोंडे, अजय चौलकर आदींची उपस्थिती होती. तसेच, नागाव सरपंच हर्षदा मयेकर, सरोज वरसोलकर, मनिषा चुनेकर, जयश्री पाटील आदी महिलावर्ग देखील उपस्थित होता.

Exit mobile version